जाम रस्त्यावरील रेनकापुर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ डोंगरगड वरुन मॉ बमलेश्वीचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या दोन भावंडांच्या दुचाकीला गड्डा चुकविण्याऱ्या कारने जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ ठार झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार मृत्यक सोहम कंठीराम कोसारे वय १७ वर्ष व जखमी नयन कंठीराम कोसारे वय १५ वर्ष राहणार समुद्रपूर हे दोघे भाऊ डोंगरगड येथील मॉ बमलेश्वीचे दुर्शन घेऊन आपल्या दुचाकी क्रमांक MH32 X 9532 ने परत येत असताच कारने धडक दिली.