आज मंगळवारी संध्याकाळी ७ पासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या गौरी- गणपती विसर्जन होत आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी महापालिकेच्या वतीने एकुण 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विर्सजन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटिव्ही स्टेज, टॉवरची सोय, टेबल खुर्च्या सोय करण्यात आली आहे.