यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर पाटीपुरा येथे दिनांक 25 ऑगस्ट रोजी मंदा पवार यांच्यासोबत दोन जणांनी घर खाली करण्याच्या कारणावरून वाद घालून शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली आणि घरातील सामान फेकून तेथून निघून गेले.सदर घटने संदर्भात मंदा पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोन जणांवर विविध कलमानुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.