भंडारा वनविभागातील मानव व वन्यजीव संषर्ष तसेच वन्यप्राण्यांकडून शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 96 गावातील 2 हजार 864 शेतक-यांना अनुदानातून सौर कुंपन दिल्या जाणार आहे. , लाभार्थ्यांच्या यादीला वनविभागाने मंजूरी दिली आहे, अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. शेतक-यांना सौर कुंपन करण्यासाठी 75 टक्के अनुदान राज्य सरकार देणार आहे.