महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या नेतृत्वाखाली रात्रकालीन शाळा शिक्षक आणि जिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संविधान चौक येथे अनोखे 'भीक मांगो ' आंदोलन केले. राज्य सरचिटणीस महेश जोशी आणि शरद भांडारकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.