मागील तीन वर्षांपासून वसई विरार शहर महानगरपालिका पर्यावरण स्नेही गणेशोत्सव उपक्रम राबवत आहेत. महानगरपालिका कृत्रिम तलावांची देखील निर्मिती करत आहे. यावर्षी महानगरपालिका मार्फत 105 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि महापालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.