विसोरा येथे आज दिनांक १८ सप्टेंबर रोज गूरूवार रोजी सांयकाळी ७ वाजताचा सूमारास विसोरा येथील गावामधे बिबटय़ा दिसून आला, विसोरा येथील सलंग टोली येथे राहणाऱे अशोक नेवारे यांच्या अंगणात बांधून असलेली शेळी बिबटने हल्ला करीत ठार केली यावेळी गावातील लोकांनी आरडा ओरड करीत बिबटयाला घटणास्थळावरून हुसकावून लावले. यावेळी गावा जवळ असलेल्या गाढवी नदी कडे बिबट्या ने धूम ठोकली सदर घटणेमूळे विसोरा गावात दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे.