बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींबद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याच पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घाटकोपर पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर, न्यू वेलकम हॉटेल जवळ भाजप ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. या आंदोलनात प्रदेश, मुंबई, लोकप्रतिनिधी, जिल्हा, मंडळ, वार्ड पदाधिकारी व मोर्चा आघाडी प्रकोष्ठातील कार्यकर्ते उपस्थितीत होते.