श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती यांची ऐतिहासिक अशी हरिहर भेट संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान ही हरिहर भेट संपन्न झाली. ढोल ताशांच्या गजर श्रीमंत दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष यांनी श्रीमंत बाबा गणपती यांची आरती केली तर श्रीमंत बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष यांनी श्रीमंत दादा गणपती यांची आरती केली. या महाआरतीनंतर संपूर्ण परिसर गुलाल उधळीत फटाक्यांच्या आतिश बाधित टाळ्यांच्या गजरात बाप्पाच्या जयघोषात हरिहर भेट संपन्न झाली.