आरमोरी – वडसा महामार्गावर एका शेताजवळील झुडपातून दुर्मिळ सरडा रस्ता ओलांडत असल्याचे याच वेळी या रस्त्याने देसाईगंज कडे जात असलेले वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सहसचिव तथा सर्पमित्र दिपक सोनकुसरे यांना दि.२९ आगस्ट शूक्रवार दूपारी २ वाजताच्या सुमारास निदर्शनास आला. हा सरडा दुर्मिळ असून फार कमी प्रमाणात आढळून येत असतो. या सरड्याविषीयी समाजात गैरसमज असल्याने याला विषारी समजून मारले जाते त्यामुळे ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.