थायलैंड येथे आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय तायकांडो चॅम्पियनशिप 2025 मध्ये गोंदिया चे सुपुत्र कुंजन डोये यांनी सिनिअर पुरुष अंडर 54 वजन गटात कास्यपदक जिंकून देश आणि गोंदियाचे नाव झळकाविले. कुंजन ने मिळवलेल्या यशाबद्दल गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कास्यपदक विजेता कुंजन डोये याचे पुष्पगुच्छ देऊन आपल्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार केले. यावेळी परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.