गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केली तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठापना व आरतीला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.