मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उद्या राहुरीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत आज सोमवारी सकाळी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना याबाबदचे निवेदन देण्यात आले आहे.