आज दि 11 सप्टेंबर दुपारी चार वाजता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात भीषण अपघात झाला आहे दुचाकी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू. अपघातानंतर घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आज दुपारी चार वाजता वेरूळ घाटात आयशर आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली या धडकेत आयशरमध्ये ठेवलेला जड लोखंडी बॉयलर खाली पडला आणि त्याखाली दुचाकी वरील दोन जणांचा दबून मृत्युमुखी पडले या अपघातामुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न करत आहे