दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 23 वर्षीय तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, निकिता अर्जुन सोरेगावकर (वय 23, रा. येळेगाव, ता. द. सोलापूर) ही सकाळी पावणे अकरा वाजता घराजवळील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक पोलवरील स्टार्टर पेटीचे बटण दाबत असताना अचानक विजेचा धक्का बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मंद्रुप पोलीसात झाली आहे.