भुदरगड तालुक्यातील बशाचामोळा येथील प्राथमिक शाळा 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानांतर्गत तालुक्यात अव्वल ठरली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रोत्साहनपर शासनाने या शैक्षणिक सत्रात ही अभिनव स्पर्धा आयोजित केली होती. तालुक्यात अव्वल येणाऱ्या शाळेला ३ लाख तर राज्यात अव्वल येणाऱ्या शाळेला ५१ लाख इतके बक्षीस जाहीर करण्यात आले .