जळगाव शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व खुले नाट्यगृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रविवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता काही तरुणांनी नाट्यगृहात मद्य आणि मांसाहाराची पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर चौघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे.