आज दिनांक ०५-१०-२०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी व विजयादशमी निमित्त खंड सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अनुशासन शिस्त देशभक्ती आणि संस्कार यांचा अद्वितीय संगम दाखवत भव्य पथ संचालनाचे आयोजन केले. शिस्तबद्ध तुकड्यांमध्ये पांढऱ्या गणवेशातील स्वयंसेवक हातात भगवा ध्वज आणि देशभक्तीपर घोषणांनी शहर भारावून गेले होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय संस्कृती राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.