परळी तालुक्यातील नंदागौळ येथील २५ वर्षीय श्रीनाथ गीते यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते नुकतेच वसंतनगर आश्रमशाळेत सेवक म्हणून रुजू झाले होते.कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, संस्थाचालकांकडून सतत छळ व पगार न देण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी संस्थाचालक उद्धव कराड आणि संजय राठोड यांच्यावर शनिवार दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.