बीड मतदारसंघातील म्हाळसापूर तांड्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गावकऱ्यांशी संवाद साधला.या वेळी गावकऱ्यांनी वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य सुविधा या अडचणी आमदारांना सांगितल्या. आमदार क्षीरसागर यांनी या सर्व प्रश्नांवर लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.तसेच शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी गावकरीही जागरूक राहावेत, असं आवाहन त्यांनी केलं. गावाचा विकास हा शासन आणि गावकरी दोघांनी मिळून करायचा असतो, हे