कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांचा सहधर्मचारिणी बदामी देवी सह त्यांच्या गृह गावी उ. प्र.तील महू, कुशीनगर येथे जाताना मागील 23 ऑगस्टला घटनास्थळीच अपघाती मृत्यू झाला होता. तर वाहन चालक वैभव मिश्रा हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचाही सोमवार दि. 25 ऑगस्टला सकाळी आठ वाजता मृत्यू झाल्याची बातमी संस्कृत विश्वविद्यालय रामटेक परिसरात येतात सर्वांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर आता या अपघातातील मृत्युसंख्या ही तीन वर पोहोचली आहे.