आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दुसऱ्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण झालं आहे. शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडात करण्यात आलं. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या गणरायाला निरोप देताना भक्तांचा कंठ दाटून आला होता. जालन्यात 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू झालं होतं. हे विसर्जन आज 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4: वाज