चंदनापुरी घाटात आयशर टेम्पो पलटी; चालक गंभीर जखमी, महामार्गावरील वाहतूक ठप्प संगमनेर तालुक्यातील नाशिक–पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आयशर टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत चालक ज्ञानेश्वर पाटील (रा. धुळे) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाट उतरत असताना एका वळणावर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने वाहन शंभर फूट घसरत जाऊन महामार्गाच्या मधोमध उलटले. अपघातानंतर पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.