उदगीर शहरातील एस टी काॅलोनी येथील एकाच्या घरातील कपाटातील १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोने - चांदीचे दागिने व अन्य एकाच्या घरासमोरील ७० हजार रुपयांची दुचाकी असे एकुण २ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे.