सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरे ब्रिजखाली पोलिसांनी अवैध वाळू चोरीचा टेम्पो पकडला. या कारवाईमध्ये पोलिसांनी ३ लाख रुपयांचा टाटा कंपनीचा टेम्पो आणि ८ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक पळून गेला. सदरची कारवाई ही 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अनोळखी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.