सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कडक आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) व (३) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. आजपासून लागू झालेल्या या आदेशानुसार, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे किंवा कायदा व