फिर्यादी अविनाश मारोती चव्हाण यांच्या तक्रारीनुसार 23 ऑगस्टला सात वाजताच्या सुमारास आरोपी आकाश कुडमेथे व आणखी एक अशा दोघांनी दारू पिऊन दारूच्या नशेत फिर्यादीस तुझा भाऊ कुठे गेला असे म्हणून शिवीगाळ करून चाकूने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी 23 ऑगस्टला रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.