धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्वरित मोफत गणवेश देण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दि.२ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महिनाभरात संबंधितांना सूचना द्याव्यात, अन्यथा पहिली ते आठवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा दुधगावकर यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.