भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे 1 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत गणपती बाप्पांचे दर्शन घेतले यामध्ये त्यांनी श्री भ्रुशुंड गणेश मंदिर, मेंढा तसेच विघ्नहर्ता गणेश मंडळ, दवाखाना रोड, भंडारा व मैत्री गणेशोत्सव मंडळ, चांदणी चौक, भंडारा येथे भेट देऊन गणपती बाप्पाचे मंगलमय दर्शन घेतले.