अरेरिया पोलीस ठाणे बिहार मधील हरवलेली महिला पिंकी देवी राजेश कुमार देहाती वय ४६ राहणार अरेरिया बिहार ही आज राजापूर येथील पाचल बाजारपेठेत परिसरात सापडली. महिला मिळून आल्यावर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांना रत्नागिरीत पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसाचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित महिलेस सखी वन स्टॉप रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे.