मुंबईत श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषात साज-या होणाऱ्या श्री गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा श्रीगणेशोत्सव 'राज्य उत्सव' म्हणून जाहीर केला आहे. या अनुषंगाने आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिवसभर मुंबईतील प्रमुख श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्थळांची पाहणी करून उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला. स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), दादर चौपाटी, माहीम रेती बंदर चौपाटी येथे पाहणी केली.