धुळे शहरात गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्यावर, ईद-ए-मिलाद मिरवणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. गणेश विसर्जनानंतरच मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेऊन सामाजिक सलोखा जपला. त्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने जुना आग्रा रोडवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्ता धुऊन स्वच्छ केला व कचरा हटवला. समाजाची समजूतदार भूमिका आणि प्रशासनाची तत्परता यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.