ग्रामीण भागात असलेल्या मौजा रत्नापुर येथे घराशेजारी बांधुन ठेवलेल्या गाईवर विद्युत तार पडल्याने विद्यूत करंट लागून गायीचा मृत्यू झाल्याची घटना 24 आगस्ट रविवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गोपालक महादेव डहारे यांनी सायंकाळी सुमारास घराशेजारी गाय बांधून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास झाड विद्युत तारावर पडले आणी विद्यूत तार गाईवर पडल्याने करंट लागून गायीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती विद्यूत वितरण कंपनी, पोलीस स्टेशन वेलतुर येथे देण्यात आली.