कोरणी घाट वाघनदीवरील पूल महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. या मार्गावर जड-अवजड व हलक्या वाहनांचे २४ तास आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू असते. गणपती विसर्जनाकरिता येणारी जड-अवजड व हलकी वाहने व त्यांच्या सोबतच्या इतर वाहनांची व नागरिकांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होऊन गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहतूककोंडीचा फायदा घे