पूर संकटामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिकव्हरी कमी मिळून नुकसान होऊ शकते. त्यामुळे 15 ऑक्टोबर ऐवजी एक नोव्हेंबर पासून गाळप हंगामाला परवानगी मिळावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याची माहिती अनगर येथील लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली आहे. ते आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून उशिरा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.