आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या भावनेचे प्रतिबिंब पाडत आहे. ऑपरेशन सिंदूरचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या आवाहनाला लोकांनी जनआंदोलन म्हणून स्वीकारले आहे.