आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास युवक काँग्रेसचे मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी आवाज उठवला आहे. कोकणात जाण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात २०० पेक्षा जास्त एस टी गाड्या आणून ठेवल्या आहेत. मात्र या एस टी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचं राणे यांनी सांगितलं असून संताप व्यक्त केला आहे.