नागपूर शहरातील बजरीया भागात जुन्या एम्प्रेस मिलची २० ते २२ फूट उंचीची भिंत रविवारी रात्री अकरा वाजून 19 मिनिटांच्या च्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेदरम्यान भिंत कोसळल्याने त्याचे अवशेष सुरुवातीला विद्युत तारांवर पडले, ज्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ही संपूर्ण घटना एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.