नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दीड वर्षांपूर्वी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु संशयित आरोपी विरुद्ध कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले. गुरुवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या तोंडी आश्वासनानंतर आमरण उपोषण माघारी घेण्यात आले आहे.