जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या लोक अदालती मध्ये वाहनांवर असलेले चालान कमी करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागपूरकर जिल्हा व सत्र न्यायालयात या लोक अदालती मध्ये वाहनाचे चालन कमी करण्यासाठी पोहोचले. परंतु अशा प्रकारे चालान कमी होत नसल्याची माहिती यावेळी ट्राफिक पोलिसांनी दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला.