अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील नितीन माणिक चव्हाण वय 30 तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सोमवार दि.8 सप्टेंबर रोजी, सकाळी 11 वाजता, या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांना दिलासा देत दु:खात धीर धरण्याचे आवाहन केले.यावेळी धनंजय मुंडे यांनी, आरक्षणाच्या मागणीसाठी अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नये, असे सांगत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली.