जळगाव शहरापासून जवळ असलेल्या उमाळा शिवारात असलेल्या जंगलात देव्हारी येथील ३५ वर्षीय तरुण हा मयत स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सरदार जगन पवार वय-३५, रा. देव्हारी ता.जळगाव असे मृत तरुणाचे नाव असून या संदर्भात बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.