आरमोरी-गडचिरोली महामार्गावर चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या भीषण अपघातानंतर, दोन गंभीर जखमी तरुणांसाठी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने दाखवलेली तत्परता आणि माणुसकीची जाणीव संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरली आहे.अपघाताच्या काही तासांतच नागपूर येथे तातडीच्या उपचारासाठी या जखमींना पोहचवण्यासाठी कंपनीने स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर विनाशुल्क उपलब्ध करून दिले. यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने या दोन जखमींच्या जीवाला संजीवनी मिळाली आहे.