लोणार शहरातील तहसील कार्यालय येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जन सुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने जन आंदोलन करुन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आश्रुजी फुके, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद आदी उपस्थित होते.