नाशिक रोड परिसरात रस्त्यांवर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने लाखो रुपयांचे टेंडर दिले होते मग ते टेंडर फक्त बोलण्यापुरतेच का त्याची अंमलबजावणी कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून सध्या विचारला जात आहे गेंड्याची कातडीचे प्रशासन नागरिकांच्या सोयी सुविधा पुरविण्यास कायमच कमी पडत असल्याचेही या चित्रावरून दिसून येत आहे . या खड्ड्यांमुळे खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक नागरिकांचे अपघात होत आहे मग अजून प्रशासन किती लोकांचा जीव घेणार ?