मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पालघर जिल्हा येत्या काळात विकासाचे सर्वात मोठे स्थान होणार असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात काम करत आहेत. पालघर जिल्हा येणाऱ्या काळात महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा जिल्हा असून या जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.