मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-गणपतीपुळे मार्गावर बेकायदेशीररित्या तंबाखू आणि पानमसालाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू तसेच बोलेरो गाडी असा एकूण ८ लाख ३० हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली तर या प्रकरणी शिवाजी अनंतराव चव्हाण (वय ५०, रा. फणसोप सडा) याला अटक करण्यात आली