लोणी व्यंकनाथमध्ये कोयत्याने हल्ला; दगडफेक-शिवीगाळीतून तणाव, पोलिसांत गुन्हा दाखल ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे अखेर गंभीर प्रकार घडला. 2 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले.