वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोडक कारवाई केली आहे. ससूनवघर, पेल्हार, ढधानिव परिसरात अनधिकृत गाळे बांधकाम निष्कासित करण्यात आले आहेत. 36 हजार वर्ग फुटावर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्याने महानगरपालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले आहे. महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने प्रभाग समिती एफ सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही तोडक कारवाई केली आहे.