महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शुक्रवारी दुपारी एक वाजता वाई प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, किंचक टेकडी येथे बेकायदेशीर उत्खनन केले आहे त्याप्रकरणी केलेला दंड तात्काळ असून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.